Ads

Monday, November 23, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला मिस करणार टीम इंडिया; पाहा हिटमॅनचे विक्रम!

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला असून येत्या २७ तारखेपासून वनडे मालिका सुरू होत आहे. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. भारतीय संघात वनडे आणि टी-२० साठी रोहित शर्माचा () समावेश केला नाही. दुखापतीमुळे रोहितला प्रथमच संपूर्ण मालिकेसाठी विचार केला नव्हता. नंतर मोठा वाद झाल्यावर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण वनडे आणि टी-२० मध्ये रोहितची गैरहजेरी भारतीय संघाला जाणवणार आहे. जाणून घ्या याची कारणे... वाचा- रोहित शर्माची आकडेवारीच सांगते की तो किती खास आहे. २०१३ पासून वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. या काळात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर चार शतक केली आहेत. रोहितने १२ जानेवारी २०१६ रोजी पर्थमध्ये १६३ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या. पराभव झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. रोहित असा एकमेव फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर चार शतक झळकावली आहेत. या चारही सामन्यात भारताचा पराभव झाला होता. वाचा- रोहित हा असा एकमेव फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत द्विशतक झळकावले आहे. त्याने बेंगळुरू येथे १५८ चेंडूत २०९ धावा केल्या होत्या. २ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याने १६ षटकार आणि १२ चौकारांसह धमाकेदार खेळी केली होती. त्याने षटकार आणि चौकारांसह १४४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात चौकार आणि षटकाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० वनडेत ७६ षटकार मारले आहेत. जगातील अन्य फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० षटकार देखील मारले नाहीत. वाचा- जून २०१७ ते जानेवारी २०१९ या काळात झालेल्या १० वनडे मालिकेत कमीत कमी एक तरी शतक करणारा हा एकमेव फलंदाज आहे. या शिवाय रोहितने वनडे सर्वाधिक द्विशतक झळकावली आहेत. रोहितने श्रीलंकेविरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शतक केले आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन वेळा द्विशतक करता आले नाही. त्याने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूत २६४ धावा केल्या होत्या. वाचा- रोहितने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतके केली होती. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने २०१३-२०१४ च्या वनडे मालिकेत ११२.७५ च्या सरासरीने ४९१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत कोणत्याही संघाच्या फलंदाजाने केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत. या शिवाय सलग सात कॅलेंडर इयर (२०१३-२०१९) मध्ये रोहितची सरासरी ५०च्या वर होती. असे करणारा तो एकमेव फलंदाज आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये ८ वेळा १५० हून अधिक धावा केल्या आहेत. टी-२०मधील विक्रम... >>क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारात चार शतक करणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे. >>टी-२०मध्ये सर्वाधिक १२७ षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. >>रोहितने २५ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2J3J0JR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...