सिडनी, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर आता दिल्लीकर आशीष नेगरानेच जोरदार टीका केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका गमावली आहे. या मालिकेत कोहलीला गोलंदाजांना व्यवस्थित हाताळता आले नाही, अशी टीका नेहराने यावेळी केली आहे. नेहरा म्हणाला की, " कोहली हा निर्णय घेताना भरपूर घाई करतो. गोलंदाजीमध्ये कोहली हा फार लवकर बदल करतो, त्यामुळेच त्याला जास्त यश मिळत नाही. दुसऱ्या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून दोन षटके टाकून घेतली. त्यानंतर त्याने नवदीप सैनीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. पण मला वाटते की, शमीला दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करायला द्यायला हवी होती. पण त्यानंतर कोहलीने जसप्रीत बुमराला दोन षटके टाकायला दिली. या गोष्टीमध्ये कोहलीने बदल करायला हवा, असे मल वाटते." नेहरा पुढे म्हणाला की, " गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथला हार्दिक पंड्याने बाद केले. पण कोहलीने त्याला चार षटकेच गोलंदाजी दिली. त्यानंतर त्याने मयांक अगरवालकडून गोलंदाजी करून घेतली. हा कोहलीने मैदानात घेतलेला निर्णय असावा. कारण जर मुख्य गोलंदाज चांगली कामगिरी करत असले असते तर कोहलीला ही गोष्ट करावी लागली नसती. पण भारताच्या मुख्य गोलंदाजांना विराट अजून चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. त्याने मुख्य गोलंदाजांना हाताळताना जास्त घाई करता कामा नये, असे मला तरी वाटते." कोहली हा फलंदाजी करतानाही जास्त घाई करताना दिसतो, असेही नेहराचे म्हणणे आहे. याबाबत नेहरा म्हणाला की, " पहिल्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा कोहलीचा झेल सुटला तेव्हा तो फलंदाजी करताना जास्त घाई करत आहे, असे वाटले. कारण आतापर्यंत कोहलीने बऱ्याचदा ३५० धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी केली आहे. त्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्यावेळी मला असे वाटले की, चकोहली ३५० नाही तर ४७५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mj22KB
No comments:
Post a Comment