सिडनी, : : भारताविरुद्धच्या आजच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियचा कर्णधार आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी इतिहास रचला आहे. आतापर्यंत वॉर्नर आणि फिंच यांच्यासारखी कामगिरी कोणत्याही जोडीला क्रिकेटमध्ये करता आलेली नाही. त्याचबरोबर वॉर्नर आणि फिंच यांनी यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक विक्रम मोडीत काढला आहे. आजच्या सामन्यात वॉर्नर आणि फिंच यांनी १५६ धावांची दमदार सलामी दिली आणि भारतीय गोलंदाजीचा कणा मोडला. फिंचने आजच्या सामन्यात ११४ धावांची महत्वाची शतकी खेळी साकारली, तर वॉर्नरने या सामन्यात ६९ धावा फटकावल्या. या दमदार कामगिरीसह वॉर्नर आणि फिंच यांनी भारताविरुद्ध इतिहास रचला आहे. भारताविरुद्ध सर्वात जास्त १५०पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचण्याचा विक्रम आता वॉर्नर आणि फिंच यांच्या नावावर झालेला आहे. वॉर्नर आणि फिंच यांनी आजच्या सामन्यात १५६ धावांची सलामी दिली. ही वॉर्नर आणि फिंच यांची भारताविरुद्धची चौथी १५०पेक्षा जास्त धावांची सलामी होती. आतापर्यंत एका संघाविरुद्ध १५०पेक्षा जास्त धावा वॉर्नर आणि फिंच वगळता कोणालाही करता आल्या नाहीत. यापूर्वी हा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट यांनी श्रीलंकेविरुद्ध तीनवेळा १५०पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली होती. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरही भारताची जोडी आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तीनवेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना १५०पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. पण भारताच्या जोडीला या मालिकेत जहा विक्रम रचण्याची संधी नाही. कारण दोन्ही मोठ्या भागीदारींमध्ये रोहित शर्माचे नाव आहे आणि रोहित या मालिकेत खेळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mgUZ56
No comments:
Post a Comment