Ads

Friday, November 27, 2020

Phillip Hughes: अजूनही ६३ धावांवर नाबाद, ऑस्ट्रेलियाने गमावला होता युवा खेळाडू

नवी दिल्ली: भारत आणि यांच्यातील मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. सिडनी येथे वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. आजच्या दिवशी सहा वर्षांपूर्वी संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का देणारी घटना घडली होती. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू () ची आयुष्याची लढाई हरला होता. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूचा अकाली मृत्यू झाला. वाचा- ह्यूजचा त्याच्या २६व्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शील्ड ट्रॉफीतील सामन्यात साउथ ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या फिल ह्यूजला २५ नोव्हेंबर रोजी न्यू साउथ वेल्सचा जलद गोलंदाज सीन एबॉटचा बाउंसर चेंडू लागला. एबॉटचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करताना ह्यूज जखमी झाला. चेंडू त्याच्या हेलमेटच्या खालच्या बाजूला लागला. तेव्हा तो ६३ धावांवर खेळत होता. चेंडू लागल्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि खाली झुकला. पण काही सेंकदातच बेशुद्ध होत खाली कोसळला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की सामना तेथेच थांबवण्यात आला. ४९व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूनंतर तो सामना पुढे खेळला गेला नाही. वाचा- जखमी ह्यूजला मैदानातून स्ट्रेचरने सेंट विंसेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्याचा जीव वाचवता आला नाही. ३ डिसेंबर रोजी ह्यूजला अखेरचा निरोप देण्यात आला. यासाठी ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक क्रिकेटपटू, राजकीय नेते आणि अन्य लोक होते. वाचा- तत्कालीन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने ह्यूजचे वडील आणि भावासह पार्थिवाला खांदा दिला होता. तेव्हा भारतीय संघाचे डायरेक्टर रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर देखील उपस्थित होते. ह्यूजच्या निधनानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. ह्यूजच्या मृत्यूसाठी कोणाला दोषी ठरवण्यात आले नाही. पण समितीने क्रिकेटला अधिक सुरक्षित करण्याचा सल्ला दिला. चेंडूचा अंदाज घेण्यात झालेली छोटीशी चूक आणि शॉट खेळण्याचा अंदाज चुकल्याने ह्यूज जखमी झाल्याचे समितीने म्हटले. वाचा- ह्यूजने २६ कसोटी ३२.६५ च्या सरासरीने १ हजार ५३५ धावा केल्या. कसोटी त्याने ३ षटक आणि ७ अर्धशतक केली होती. वनडेतील २५ सामन्यात त्याने दोन शतक आणि ४ अर्धशतकासह ८२६ धावा केल्या होत्या. अखेरच्या डावात ह्यूज नाबाद ६३ धावांवर राहिला तो कायमचा...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mdMlUP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...