नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा केली. करोना व्हायरसमुळे ही मालिका या वर्षाच्या सुरुवातीला स्थगित करण्यात आली होती. एका ऑनलाइन कार्यक्रमात गांगुलीने इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर फेब्रुवारी-मार्च महिन्यात येणार आहे. इंग्लंडचा संघ चार सामन्यांची कसोटी, तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या वर्षी करोनामुळे कसोटी मालिका ५ ऐवजी ४ सामन्यांची होणार आहे. द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करणे तुलनेत सोपे असते. यात लोकांची संख्या कमी असेत. जेव्हा आठ किंवा दहा संघ असतात तेव्हा आयोजन अधिक अवघड होते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत कारण अनेक जण कोरनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा करत आहेत, असे गांगुलीने सांगितले. वाचा- या दौऱ्यात प्रथम प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० सामने होणार होते. जे च्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार होते. पण करोनामुळे त्याला स्थगित देण्यात आली होती. आता नव्या नियोजनानुसार टी-२० सामन्यांची संख्या वाढवली आहे. भारतात पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा विचार करून टी-२० सामन्यांची संख्या वाढवली आहे. भारत देखील जाणार इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात ट्रेंट ब्रिज येथेून ४ ऑगस्ट रोजी होईल. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित झाला आहे. कसोटी सामन्यांची तारीख आणि स्थळ यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणार आहे. हेडिंग्लेच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट या दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये ओव्हल या मैदानात खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा आणि पाचवा कसोटी क्रिकेट सामना १० ते १४ सप्टेंबर या दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात होणार आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणइ इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट- ट्रेंट ब्रिज दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर- ओव्हल पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर- ओल्ड ट्रॅफर्ड.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KBd3c9
No comments:
Post a Comment