सिडनी, : पहिल्या सामन्यात विराट कोहलीला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. भारताच्या पराभवाचे हे एक मोठे कारणही होते. पण सिडनीच्या मैदानात कोहली हा सातत्याने फ्लॉप ठरताना दिसत आहे. या मैदानात कोहलीच्या नावावर नकोशी कामगिरी आतापर्यंत झालेली आहे. याच सिडनीच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामनाही रंगणार आहे. कोहलीने सिडनीच्या मैदानात आतापर्यंत सहावेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे. पण या सहा डावांमध्ये विराट कोहलीला फक्त ५७ धावाच करता आल्या आहेत. विराट कोहलीची या सहा सामन्यांमध्ये ११.४ एवढी वाईट सरासरी आहे. या मैदानात कोहलीने सर्वाधिक २१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामनाही याच मैदानात होणार आहे. त्यामुळे विराटची कामगिरी जर अशीच राहिली तर भारतीय संघाचे काय होणार, याची चाहत्यांना चिंता आहे. पण भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी हे मैदान चांगलेच लकी ठरले होते. कारण या मैदानात सचिनने चार शतके लगावली होती. पण कोहलीला मात्र सहा डावांमध्ये शंभर धावाही करता आलेल्या नाहीत. त्यामुळे कोहलीसाठी हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले जात आहे. कोहली दुसऱ्या सामन्यात या मैदानातील धावांचा दुष्काळ संपवणार का, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीसाठी अॅडलेडचे मैदान चांगलेच लकी ठरले आहे. कारण या मैदानात कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय सामने मिळून ११ वेळा फलंदाजी केली आहे. या ११ डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत ७६५ धावा केल्या आहेत, यामध्ये पाच शतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या मैदानात कोहलीची सरासरी ही ७६ एवढी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला दिवस-रात्र सामना याच मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मैदानात कोहली किती धावा करतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळए दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीची बॅट तळपणार का, हे पाहावे लागणार आहे. जर कोहली पुन्हा फ्लॉप ठरला तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mgu4pT
No comments:
Post a Comment