मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत आहे. त्याचबरोबर शहा यांच्याबरोबर बीसीसीआय चालवण्यात कोणाचा हात आहे, हेदेखील महान इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटले आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमध्येही गुहा यांनी काम केले होते. त्यामुळे क्रिकेट आणि बीसीसीआयचा चांगलाच अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटमधील घराणेशाहीवर गुहा यांनी बोट ठेवले आहे. गुहा यांनी बीसीसीआयमध्ये काम करत असतानाचे आपले अनुभव 'द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट' या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. त्याचबरोबर गुहा यांनी 'मिड डे' या वर्तमानपत्राला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गुहा यांनी बीसीसीआय अमित शहा यांच्याबरोबर माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन चालवत आहे, असा गंभीर आरोप यावेळी केला आहे. गुहा यांनी नेमके काय म्हटले आहे, पाहा... गुहा यांनी आरोप करताना म्हटले आहे की, " सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्येही घराणेशाही पाहायला मिळते. कारण राज्य क्रिकेट संघटना सध्याच्या घडीला कोणा मोठ्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी चालवत आहे. या सर्वांवर अमित शहा आणि एन. श्रीनिवासन यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे. या सर्व राजकारणामुळे रणजी करंडक खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना वेळेवर पैसेही मिळत नाहीत. बीसीसीआयमध्ये सध्याच्या घडीला कोणतीही सुधारणा झालेली पाहायला मिळत नाही." गुहा यांची गांगुलीवरही टीका गुहा यांनी यावेळी बीसीसीआये अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरही टीका केली आहे. गुहा म्हणाले की, " बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आहेत. पण ते सध्याच्या घडीला क्रिकेट फँटसी लीगचे प्रतिनिधीत्व करत आहेत. माझ्यामते ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटपटूंना केवढे पैसाचे अमीष आहे, हे या गोष्टीमुळे सर्वांसमोर येत आहे. अतिरीक्त पैसे कमावण्यासाठी गांगुली यांनी ही गोष्ट करणे योग्य आहे का? जर बीसीसीआयचे अध्यक्षच असे काम करत असतील तर क्रिकेट मंडळामध्ये काय चालत असेल, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UTDhss
No comments:
Post a Comment