सिडनी, : आजच्या भारताच्या पराभवाला भारताच्या पहिल्या पडलेल्या तीन विकेट्सही जबाबदार आहेत. पण या तीन विकेट्ससाठी फक्त एकच गोष्ट जबाबदार असल्याचे पाहायला मिळाले. जर ही गोष्ट भारतीय फलंदाजांनी व्यवस्थित हाताळली असती तर नक्कीच सामन्याचे रुप बदलू शकले असते. भारताने मयांक अगरवाल, कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तीन फलंदाजांना गमावले. भारताच्या या तीन विकेट्स या फक्त उसळत्या चेंडूवर झाल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या तिन्ही फलंदाजांना उसळत्या चेंडूचा समर्थपणे सामना करता आला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या विकेट्स गमवाल्या लागल्या आणि भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या तीन विकेट्समध्ये कोणते साम्य होते, पाहा... भारताच्या या तीन विकेट्समध्ये अजून एक साम्य होते. हे साम्य म्हणजे भारताच्या मयांक, विराट आणि श्रेयस या तिन्ही फलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने यावेळी बाद केले. हेझलवूडने यावेळी भारताच्या फलंदाजांवर बाऊन्सर्सचा जास्त मारा केला. याचा सामना भारतीय फलंदाजांना चांगल्यापद्धतीने करता आला नाही आणि त्यामुळेच त्यांना आपल्या विकेट्स गमवाव्या लागल्या. जोश हेझलवूड हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आग ओकत होता. हेझलवूडनेच भारताच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले होते. हेझलवूडने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक बाऊन्सर टाकला. त्यावेळी श्रेयसने हा बाऊन्स सोडून द्यायला हवा होता. पण या बाऊन्सचा सामना करताना श्रेयसचे डोळे बंद झाल्याचे पाहायला मिळाले आणि तो फटका मारायला गेला. यावेळी श्रेयसच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे श्रेयसला फक्त दोन धावा करता आल्या आणि भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस ज्यापद्धतीने आऊट झाला ते पाहिल्यावर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. करोनानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवत ३७४ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग कराताना भारताचे चार फलंदाज १४ षटकांत बाद झाले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यांनी यांनी चांगली भागीदारी रचली. पण भारताचा पराभव मात्र ते टाळू शकले नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33joFXF
No comments:
Post a Comment