नवी दिल्ली: देशाला पहिले वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार यांनी सर्वोत्तम भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात त्यांनी सचिन तेंडुलकर सह विरेंद्र सेहवाग यांना स्थान दिले आहे. तर विकेटकिपर म्हणून भारताला आयसीसीच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला स्थान देण्यात आले आहे. कपिल देव यांच्यात मते भारताच्या या महान खेळाडूचे स्थान अन्य कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. वाचा- कपिल देव यांनी भारतीय संघाला १९८३ साली सर्व प्रथम वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यानंतर धोनीने २०११ साली वनडे आणि त्याआधी २००७ साली टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले होते. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कपिल देव यांनी धोनीचे कौतुक केले आहे. वाचा- अभिनेत्री नेही धुपियाच्या नो फिल्टर नेहा या शोमध्ये कपिल देव धोनीचे कौतुक करतान म्हणाले, धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्याची कामगिरी अविश्वसनिय आहे. या चर्चे दरम्यान कपिल देव यांनी वनडेसाठीच्या ११ खेळाडूंची निवड केली. त्याच सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, युवराज सिंग, एमएस धोनी यांची निवड केली. तर गोलंदाजांमध्ये त्यांनी झहीर खान, जवागल श्रीनाथ, जसप्रीत बुमराह, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांची निवड केली. वाचा- सर्वोत्तम भारतीय संघ म्हटल्यावर माझ्या नजरेत जी नावे येतात त्यात हे खेळाडू आहेत. झहीर आणि हरभजन २०११ च्या वर्ल्ड कप संघात होते. जर बुमराह हा सर्वात घातक गोलंदाज असल्याचे ते म्हणाले. असा आहे कपिल देव यांचा सर्वोत्तम भारतीय वनडे संघ सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवाग विराट कोहली राहुल द्रविड युवराज सिंग एमएस धोनी अनिल कुंबळे हरभजन सिंग झहीर खान जवागल श्रीनाथ जसप्रीत बुमराह
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KsiutQ
No comments:
Post a Comment