नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Video ) टीम इंडियाला अनेक मोठे विजय मिळून दिले आहेत. सचिने बॅटने अनेक सामन्यात शानदार खेळी केल्या आहेत. पण याच सचिनने अनेक सामन्यात महत्त्वाच्या क्षणी विकेट मिळवल्या आहेत. त्यामुळेच सचिनला मॅन विद गोल्डन आर्म असे म्हटले जाते. सचिने १९९३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिरो कपच्या सेमीफायनलमध्ये अशीच धमाकेदार गोलंदाजी केली होती आणि भारताला एक शानदार विजय मिळवून दिला होता. वाचा- कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन मैदानावर हिरो कपच्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत सुरू होती. भारताचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अझरने सर्वाधिक ९० धावा तर प्रवीण आमरेने ४८ तर सचिनने १५ धावा केल्या. भारताला ५० षटकात १९५ धावा केल्या. भारताकडून फक्त तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. वाचा- विजयासाठी फार मोठे लक्ष नसेलल्या दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. पण हडसनने एकाबाजूने लढा सुरू ठेवला होता. तो बाद झाल्यानंतर ब्रायन मॅकमिलनने संघाला विजायच्या जवळ पोहोचवले. अखेरच्या षटकात आफ्रिकेला विजयाासाठी ६ धावांची गरज होती. तेव्हा कर्णधार अझरने चेंडू सचिनच्या हातात दिला. अझरचा तो निर्णय एक मोठा जुगारच होता. कारण तेव्हा कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर यांच्या ओव्हर शिल्लक होत्या. सचिने टाकली मॅजिक ओव्हर जो सचिन फलंदाजीसाठी ओळखला जातो त्याने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीद्वारे कमाल केली. सचिनने अखेरच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूवर एकही धाव दिली नाही. चौथ्या चेंडूवर एलन डोनाल्ड धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेला ४ धावांची गरज होती. ब्रायन मॅकमिलनला सचिनच्या चेंडूवर धाव घेतला आली नाही आणि भारताने विजय मिळवला. आफ्रिकेला ९ बाद १९३ धावा करता आल्या. या विजयानंतर भारताने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत जिंकला. वाचा- अझर म्हणाला होता... या सामन्याबद्दल बोलताना कर्णधार म्हणाला होता की, अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज होती. कोणालाही गोलंदाजी देता आली असती. मॅकमिलन खेळत होता. त्यामुळे अशा गोलंदाजाला चेंडू देणे गरजेचे होते जो धावा रोखू शकेल. तेव्हा अचानच सचिनकडे चेंडू दिला आणि त्याने कमाल केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fwRwg2
No comments:
Post a Comment