सिडनी, पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पण भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी का दिली नसल्याचे पाहायला मिळाले. पण हार्दिक पंड्या गोलंदाजी नेमकी करणार तरी कधी, याचे उत्तर आता मिळाले आहे. याबाबत विचारल्यावर हार्दिकने सांगितले की, " आपण कधीही मोठे लक्ष्य डोळ्यापुठे ठेवायला हवे. आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि महत्वाच्या स्पर्धांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या मोठ्या स्पर्धांमध्ये माझी गोलंदाजी महत्वाची ठरेल. त्यामुळे सध्याच्या घडीला मी त्या गोष्टीवर काम करत आहे. मला अधिक वेगवान गोलंदाजी करायची आहे. त्यासाठी मी सध्याच्या घडीला काही गोष्टींवर भर देत आहे. पण योग्यवेळ आल्यावर मी नक्कीच गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेन." हार्दिक पंड्याबाबत कोहली नेमकं काय म्हणाला, पाहा... भारतीय गोलंदाजांच्या धुलाईनंतरही पंड्याला गोलंदाजी का दिली नाही, याबाबत कोहली म्हणाला की, " दुर्देवाने हार्दिक पंड्या हा गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याचबरोबर माझ्याकडे अन्य कोणतेही गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध नव्हते. ऑस्ट्रेलियाकडे मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आहे. पण आमच्या सामन्याकडे असे कोणतेच पर्याय उपलब्ध नव्हते." याापूर्वी हार्दिकला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणूनही वापरण्यात आले आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकला गोलंदाजी करताना समस्या जाणवत आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही आपल्याला हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे हार्दिकला सध्याच्या घडीला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान न देता एक फलंदाज म्हणून स्थान देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.चहल- १० षटकात ८९ धावा जडेजा- १० षटकात ६३ धावा सैनी- १० षटकात ८३ धावा बुमराह- १० षटकात ७२ धावा शमी- १० षटकात ५९ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्याने सामान संपल्यावर संघातील खेळाडूंची सर्वांसमोरच चांगली शिकवणी घेतली. भारतीय संघातील खेळाडूंबाबतच कोहलीने काही प्रश्न उपस्थित केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39uKMye
No comments:
Post a Comment