नवी दिल्ली: गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप () स्पर्धेत भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. या स्पर्धेनंतर आतापर्यंत टीम इंडियाच्या निवडीवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता तत्कालीन निवड समिती सदस्याने एक त्यांची चूक मान्य केली आहे. वाचा- वर्ल्ड कप २०१९ साठी भारतीय संघात मधळ्या फळीत अंबाती रायडूचा समावेश न करणे ही मोठी चूक होती, असे निवड समितीच्या सदस्याने म्हटले आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रायडूच्या ऐवजी विजय शंकर याची निवड केली होती. समितीने शंकरला स्फोटक फलंदाज असल्याचे म्हटले होते. ज्यावर रायडूने ट्विट देखील केले होते. रायडूची निवड न झाल्याबद्दल मोठा वाद देखील झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात त्याने निवृत्ती देखील घेतली होती. पण नंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये परतला. रायडू प्रकरणावर तेव्हाच्या निवड समितीमधील सदस्य यांनी मोठा खुलासा केलाय. वाचा- रायडूची संघात निवड झाली नाही यावर बोलताना गांधी म्हणाले, ती एक चूक होती. आम्ही देखील माणूसच आहोत. तेव्हा असे वाटले की आम्ही अतिशय सर्वोत्तम संघ निवडला आहे. पण नंतर याची जाणीव झाली की रायडू असता तर मोठी मदत झाली असती. वाचा- क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा एक सामना खराब झाला. त्यावरूनच रायडूच्या निवडीचा मुद्दा समोर आला. न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलची लढत वगळली तर भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. रायडूचा राग मी समजू शकतो आणि त्याची प्रतिक्रिया उत्तम होती. वाचा- पराभव रायडूने वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तेव्हापासून असे मानले जात होते की तोच या क्रमांकावर सर्वोत्तम खेळाडू आहे. पण वर्ल्ड कपच्या आधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत रायडू अपयशी ठरला. त्यानंतर निवड समितीने त्याला वर्ल्ड कप संघातून बाहेर केले. गांधींच्या आधी मुख्य निवड समिती प्रमुख प्रसाद यांनी देखील, रायडूबाबत मला फार वाइट वाटते. ते निर्णय फारच अवघड असा होता. त्याची वर्ल्ड कप संघात निवड न झाल्याबद्दल मी स्वत: दु:खी आहे, असे म्हटले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ho34FU
No comments:
Post a Comment