सूर्यकुमार यादव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या आयपीएलमध्ये सूर्यकुमारने चांगली कामगिरी केली होती. पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे चाहत्यांनी निवड समितीवर टीका केली होती. पण यानंतर सूर्यकुमार रोहितच्या रुममध्ये दाखल झाला होता आणि त्याने नेमकं काय सांगितले, याचा खुलासा आता रोहितचने केलेला आहे. रोहित याबाबत म्हणाला की, " भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. या संघात सूर्यकुमारचे नाव नव्हते. त्यामुळे तो थोडा निराश झाला होता. त्यावेळी सूर्यकुमार माझ्या रुममध्ये होता. सूर्यकुमार नाराज असल्यामुळे मी त्याच्याशी काहीच बोलत नव्हतो. पण त्यानंतर सूर्यकुमारच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी ही गोष्ट आता विसरुन गेलो आहे. त्यामुळे माझे लक्ष आता फक्त मुंबई इंडियन्सच्या विजयावर केंद्रीत केलेले आहे." रोहित पुढे म्हणाला की, " जेव्हा सूर्यकुमारने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा तो योग्य मार्गावर असल्याचे मला वाटले. कारण काही गोष्टी विसरुन पुढे जायचे असते, ते सूर्यकुमारकडून पाहायला मिळाले. ही गोष्ट फक्त आयपीएलपुरता नाही तर त्याच्या एकंदरीत कारकिर्दीसाठी महत्वाची आहे, असे मला वाटते. माझ्यामते सूर्यकुमारला यापुढेही संधी मिळू शकते. सध्याच्या घडीला सर्व संपलेले आहे, असे नाही. त्यामुळे याबाबत सकारात्मत राहायला हवे आणि सूर्यकुमार तीच गोष्ट करत असल्याचे मला समजले." भारतीय संघाची निवड झाल्यावर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा एक सामना झाला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करत असताना कोहली आणि सूर्यकुमार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे चाहत्यांचे म्हणणे होते. सूर्यकुमारने मारलेला एक चेंडू कोहलीच्या हातामध्ये गेला होता. त्यावेळी कोहली चेंडू घेऊन सूर्यकुमारकडे आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला होता. या सामन्यानंतर सूर्यकुमार आणि कोहली यांच्यामध्ये काहीतरी बोलणे झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर चाहत्यांना सोशल मीडियावर कोहलीला चांगलेच ट्रोल केले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36QHti8
No comments:
Post a Comment