Ads

Friday, November 20, 2020

सूर्यकुमार यादवने युजवेंद्र चहलला केले ट्रोल, व्हिडीओ झाला व्हायरल...

मुंबई : यावर्षीच्या आयपीएलमध्ये विजेत्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली होती. पण तरीही यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण सध्याच्या घडीला यादवने भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. चहलचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर यादवने यावेळी भन्नाट कमेंट केली आहे. आयपीएल संपल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघात चहलचाही समावेश आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत आहे. यामध्ये चहलही नेट्समध्ये फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. चहलने आपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओनंतर यादव आणि आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही चहलला यावेळी ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. चहलची फलंदाजी पाहून बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. कारण चहलला नेट्समध्येही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालेले नाही. चहल जर सामन्यात अशी फलंदाजी करत राहीला तर त्याला धावा करता येणार नाहीत, असेही चाहत्यांनी म्हटले आहे. सूर्यकुमार यादवने चहलला ट्रोल करताना म्हटले आहे की, " आता तुझ्याकडूनच मला बॅट घ्यावी लागेल." सूर्यकुमारने ही कमेंट करताना आपल्या मनातील सलही बोलून दाखवल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशिद खाननेही यावेळी चहलच्या व्हिडीओवर कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. रशिद खान चहलला म्हणाला की, " चहल तुझा हा फलंदाजीचा सराव ठिक आहे, पण आपण दोघे गोलंदाज म्हणूनच चांगले आहोत." डेल स्टेननेही यावेळी चहलला ट्रोल केले आहे. स्टेन यावेळी म्हणाला की, " चहल नेट्समध्ये वेगाने येणाऱ्या ऑफ स्पिनचा सामना करत असल्याचे वाटत आहे." या सर्व क्रिकेटपटूंच्या कमेंट्स पाहिल्यावर चहलने नेट्समध्ये नेमकी कसा फलंदाजीचा सराव केला हे सर्वांनाच कळून चुकलेले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36UpE1B

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...