नवी दिल्ली: आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे सात वर्षाची बंदीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारताचा माजी जलद गोलंदाज आता पुन्हा मैदानावर येण्यास सज्ज झाला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशन पुढील महिन्यात आळपुळ्ळा येथे टी-२० लीग स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीसंत पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. वाचा- श्रीसंतने लॉकडाउनच्या काळात नेटमध्ये जोरदार सराव केला होता. त्याच बरोबर फिटनेसवर देखील लक्ष दिले होते. केरळमध्ये आता करोना परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुरू करण्याचा विचार केला जात आहे. वाचा- केरळच्या आधी झारखंड, आंध्र प्रदेश, पुड्डुचेरी या राज्यात टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याच धर्तीवर केरळ क्रिकेट असोसिएशन देखील स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीसंतला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. पण या स्पर्धेला अद्याप राज्य सरकारला हिरवा कंदील मिळाला नाही. या स्पर्धेची तारीख निश्चित झाल्यानंतर श्रीसंत मैदानावर दिसेल. तोच या स्पर्धेचे मोठे आकर्षण ठरणार आहे. वाचा- केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वर्गीस यांनी सांगितले की, या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू बायो बबलमध्ये असेल. निश्चिपणे श्रीसंत या स्पर्धेत मोठे आकर्षणाचे केंद्र असेल. आम्ही डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहोत. श्रीसंत २००७च्या टी-२० वर्ल्ड कप विजयी संघात होता. पण २०१३ साली आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याच्यावर आजीवन बंदी घेतील होती. पण नंतर न्यायालयीन लढाईत त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी झाला. वाचा- आगामी प्रेसिडेंट कप ही त्याच्यासाठी मोठी स्पर्धा असेल. श्रीसंतने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून मिळून ६० सामन्यात ५० विकेट घेतल्या आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nOT88a
No comments:
Post a Comment