नवी दिल्ली: क्रिकेट चाहत्यांसाठी काल रविवारीचा दिवस खास असा होता. काल एकाच दिवशी सहा संघांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट सामने झाले. यातील तीन संघांनी फक्त सामना नाही तर मालिका देखील जिंकली आणि प्रतिस्पर्धा तीन संघांना सामना आणि मालिका गमवावा लागला. करोना व्हायरसनंतर बऱ्याच दिवसांनी सुरू झालेल्या क्रिकेट मालिकेत हा अनोखा योगायोग आला. वाचा- काल म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात टी-२० तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० लढत झाली. या सहा संघांपैकी भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांसाठी लढत करो वा मरो अशी होती. कारण तिनही संघांनी पहिल्या सर्व लढती गमावल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा खराब कामगिरी केली. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव झाला आणि मालिका देखील गमावली. न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला आणि मालिका गमवावी लागली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लड या संघांनी मालिका २-० अशी जिंकली. विशेष म्हणजे या सर्व मालिका एकाच दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या होत्या. वाचा- तीन वेगवेगळ्या मालिकेत विजय मिळवणाऱ्या संघांपैकी दोन संघ यजमान होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा तर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या दोन्ही संघांनी मायदेशात विजय मिळवला. या उटल इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात देशात हरवले. आता या सहा संघांमधील अखेरची लढत शिल्लक आहे. यापैकी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढत ३० नोव्हेंबर रोजी म्हणजे आज, आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील लढत १ डिसेंबर रोजी तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत २ डिसेंबर रोजी होणार आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qhapZI
No comments:
Post a Comment