सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया () यांच्यातील पहिली वनडे आज शुक्रवारी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येत आहे. करोना व्हयरसमुळे भारतीय संघाने मार्च २०२० नंतर एकही सामना खेळला नाही. पहिल्या लढतीत टीम इंडिया हिटमॅन रोहित शर्मा शिवाय खेळणार आहे. त्यामुळे सलामीला शिखर धवन सोबत मयांक अग्रवाल येण्याची शक्यता आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे क्रिकेटपासून दूर केलेल्या भारतीय संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी आंतरराष्ट्रीय लढती खेळल्या आहेत. त्याच बरोबर त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणे ही सोपी गोष्ट नाही. या सामन्यात भारतीय संघ १९९२ सालच्या वर्ल्डकपमधील नेव्ही ब्ल्यू जर्सीत दिसणार आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याची सर्वांना उत्सुकता असेल. वाचा- भारतीय संघातील फलंदाजांचा मुकाबला मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स अशा सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांशी होणार आहे. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाकडे एडम जाम्पा सारखा फिरकीपटू देखील आहे. शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांना ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अडचणीत आणू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीत स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशाने हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या वनडेत विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. असा असेल संभाव्य संघ भारत- शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया- अरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, मार्कस स्टायोनिस, अलेक्स कॅरी (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड, एडम जाम्पा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/376J0Ri
No comments:
Post a Comment