सिडनी, : ऑस्ट्रेलियाचा दौरा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवीन जर्सी मिळाली आहे. ही जर्सी पाहून चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण आल्यावाचून राहणार नाही. कशी आहे ही जर्सी...ही जर्सी निळ्या रंगामध्ये आहे. पण हा निळा रंग जास्त गडद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या जर्सीला खांद्यावर रंगीत पट्ट्या आहेत. ज्या चाहत्यांनी १९९२ साली झालेला विश्वचषक पाहिले असेल तर त्यांना त्यावेळी भारतीय संघाने परीधान केलेली जर्सी आठवत असेल. तशीच ही जर्सी आपल्याला या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यात भारतीय संघाला नवीन जर्सी मिळणार आहे, अशी जोरदार चर्चा आता सुरु होती. पण याबाबत कोणीही स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती. पण आज भारताचा सलामीवीर शिखर धवनने ही नवीन जर्सी परीधान केली आणि आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी नवीन जर्सी बनवलेली होती. त्यानंतर आता भारतीय संघाची नवीन जर्सी पाहायला मिळत आहे. भारतीय संघ जेव्हा युएईमधून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला होता, तेव्हा त्यांचा नवीन लुक पाहायला मिळाला होता. भारतीय संघातील खेळाडूंनी नवीन जर्सी आणि पीपीई किट्स परीधान केल्याचे पाहिले गेले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघ नवीन जर्सीसह उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. आज हे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत ही नवीन जर्सी घालणार असल्याचे समजते आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिल्यांदा तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ ते ८ डिसेंबर या कालावधीमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही मालिकेत भारतीय संघ ही नवीन जर्सी परीधान करून खेळणार का, याची उत्सुकता क्रिकेट विश्वातील चाहत्यांना आता लागलेली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nP5hK4
No comments:
Post a Comment