Ads

Thursday, November 19, 2020

फक्त एका फोटोमुळे सुरु झाली कपिल देव यांची लव्ह स्टोरी, पाहा नेमकं काय घडलं...

नवी दिल्ली : आतापर्यंत बॉलीवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांमध्ये आतापर्यंत बऱ्याच लव्ह स्टोरी आपण पाहिल्या आहेत. पण भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देऊन क्रांती घडवणाऱ्या कपिल देव यांची लव्ह स्टोरी ही भन्नाट आहे. कारण ही लव्ह स्टोरी फक्त एका फोटोमुळे सुरु झाली. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊया... कपिल देव यांचे नाव सर्वांनाच परिचित असे होते. रोमीदेखील त्यांना ओळखत होती. कपिल आणि रोमी यांची चांगली ओळख होती. पण या ओळखीचे प्रेमात रुपांतर होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण कपिल यांनी यावेळी भन्नाट प्रपोज केले आणि त्यानंतर या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. नेमकं घडलं तरी काय...एकदा कपिल आणि रोमी हे एका गाडीमधून प्रवास करत होते. आपण गाडीमधून प्रवास करताना बऱ्याच जाहीराती आणि होर्डिंग्स आपल्याला दिसतात. कपिल आणि रोमी एका कारमधून जात असताना त्यांनाही एक होर्डिंग दिसले. हे होर्डिंग कपिल देव यांचे होते. त्यावेळी कपिल देव यांनी रोमीला सांगितले की, या होर्डिंगचा फोटा काढून ठेव. कपिल नेमकं असं का म्हणत आहेत, हे रोमी यांना त्यावेळी समजलं नाही. त्यामुळे कारमध्ये असतानाच रोमी यांना कपिल यांना एक प्रश्न विचारला. रोमी म्हणाल्या की, ' मी या होर्डिंगचा फोटो कशाला काढू?' त्यावर कपिल देव म्हणाले की, आपल्या मुलांना हा फोटो दाखवता येईल. या उत्तरावर रोमी चांगल्या उडाल्या, त्यांना कपिल नेमकं काय बोलले आहेत, हे समजलं नाही. पण कालांतराने त्यांना ही गोष्ट समजली. त्यानंतर रोमी कपिल देव यांना म्हणाल्या की, तुम्ही मला लग्नासाठी प्रपोज करत आहात का? त्यावर कपिल यांना होकारार्थी उत्तर दिले. रोमी यांना कपिल पसंत होते, त्यामुळे या दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्यानंतर रोमी यांनी आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर रोमी यांचे वडिलही त्यांचे लग्न लावायला तयार झाले. पण सर्वात मोठा प्रश्न होता तो रोमी यांच्या आजोबांचा. कारण रोमी यांच्या आजोबांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे कपिल आणि रोमी यांचे लग्न व्हायला थोडा उशिर झाला. पण त्यापूर्वी कपिल यांनी रोमीच्या आजोबांकडून लग्नाची परवानगी मिळवली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kIGAgp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...