नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. करोना व्हायरसनंतर क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. श्रीलंकेत टी-२० लीगचा थरार असून भारतातील आयपीएल प्रमाणे तेथे श्रीलंका प्रीमियर लीग सुरू आहे. या लीग स्पर्धेत एका खेळाडूने धमाकेदार फलंदाजी केली. शनिवारी झालेल्या एका सामन्यात फक्त ५ षटकात ९६ धावा झाल्या आणि एका फलंदाजाने १४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. टी-२० क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. पावसामुळे कोलंबो किंग्ज आणि गॉल ग्लॅडिएटर्स यांच्यातील लढत प्रत्येकी ५ ओव्हरची करण्यात आली. वाचा- प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलंबो किंग्स संघाकडून आंद्रे रसेलने स्फोटक खेळी केली. त्याने फक्त १९ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे कोलंबो संघाने पाच षटकात ९६ धावांपर्यंत मजल मारली. उत्तरादाखल गॉल ग्लॅडिएटर्सला २ विकेटच्या बदल्यात ६२ धावा करता आल्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाच्या यादीत रसेल संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आला आहे. आंद्रे रसेलचा धमाका... आयपीएलमध्ये अपयशी ठरलेल्याय आंद्रे रसेलने एलपीएलमध्ये धमाका केला. त्याने १९ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावा केल्या. रसेलने फक्त दोन चेंडूवर धावा केल्या नाहीत. तर ३ चेंडूवर प्रत्येकी एक धाव आणि एक चेंडूवर एक धाव घेतली. टी-२० मध्ये आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने १४ चेंडूत अर्धशतक केले होते. १४ चेंडूत ५० धावा करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. वाचा- युवराज अव्वल स्थानी... टी-२०मधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तर ख्रिस गेलने २०१६मध्ये बिग बॅश स्पर्धेत १२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. या शिवाय हजरतुल्लाह जजईने देखील अशी कामगिरी केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mmbn4j
No comments:
Post a Comment