सिडनी: करोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट संघटनांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता परिस्थिती हळुहळु सुधारत असून अनेक देशात द्विपक्षीय मालिकांचे आयोजन सुरू आहे. करोनामुळे ज्या काही क्रिकेट संघटनांचे मोठे नुकसान झाले होते त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा () देखील समावेश आहे. करोना व्हायरसनंतर ऑस्ट्रेलियात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होत आहे. भारताच संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तो प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० तर चार कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. कारण करोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागले होते. वाचा- भारताच्या या दौऱ्यात कर्णधार चार पैकी फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. विराट नसल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नुकसान होऊ शकेत अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता याचे उत्तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दिले आहे. विराट पूर्ण कसोटी मालिका खेळणार नसल्याने आर्थिक स्वरुपात कोणतेही नुकसान होणार नाही. पण ही मालिका जागतिक क्रिकेटसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी मान्य केले. वाचा- कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेतून ऑस्ट्रेलिया बोर्डाला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विराट कोहली एडिलेड कसोटीनंतर भारतात येणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या उत्पन्नावर परिणाम होईल असे बोलले जात आहे. पण बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, आम्ही विराटच्या निर्णयाचा सन्मान करोत. आम्हाला आनंद आहे की तो वनडे आणि टी-२० तसेच पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे. वाचा- भारताच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. विराट नसल्यामुळे आम्हाला कोणताही आर्थिक तोटा होणार नाही. असे हॉकले म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/362QQff
No comments:
Post a Comment