सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहणार आहे. एक खेळाडू आणि समालोचक म्हणून जोन्स यांनी क्रिकेट विश्वात चांगले नाव कमावले होते. जोन्स हे आयपीएलचे समालोचन करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. यामध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू जोन्स यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी फित लावून मैदानात उतरणार आहेत. जोन्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी ६४ कसोटी आणि १६४ एकदिवसीय सामने खेळले होते. २४ सप्टेंबरला जोन्स यांचे निधन झाले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडू एक मिनिट शांत उभे राहून जोन्स यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यात खेळताना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांतील खेळाडू काळी फीत आपल्या जर्सीवर लावणार आहेत, असे सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राने म्हटले आहे. पहिल्या एकदिवीय सामन्यापूर्वी भारताच्या संघापुढे दोन महत्वाच्या समस्या असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाला २७ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी या समस्यांवर तोडगा भारतीय संघाला काढाला लागणार आहेत. भारतीय संघापुढे पहिली समस्या आहे की, लोकेश राहुलला नेमक्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे. कारण आयपीएलमध्ये राहुलने सलामीला येत धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे सलामीला आल्यानंतर राहुल चांगल्या फॉर्मात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे राहुलला सलामीला पाठवायचे की कोणत्या क्रमांकावर खेळवायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. भारताच्या संघापुढे दुसरी समस्या आहे की, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणत्या एका फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ikUWr
No comments:
Post a Comment