नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी चांगलेच ठुमके लगावताना पाहायला मिळाला आहे. आयपीएलपूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनी युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला होता. पण यावर्षी धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण आयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला आणि त्याने एका पार्टीमध्ये चांगलाच डान्स केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. धोनी पुन्हा दुबईमध्ये का गेला, पाहा...आयपीएल संपल्यावर धोनी पुन्हा एकदा दुबईमध्ये गेला. धोनी सध्याच्या घडीला आपल्या कुटुंबियांबरोबर काही काळ व्यतित करत आहेत. त्यासाठी त्याने थेट दुबई गाठले. यावेळी धोनी एका पार्टीमध्ये पाहायला मिळाला. या पार्टीमध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाबरोबर डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर धोनी आपल्या काही मित्रांबरोही डान्स करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर धोनीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. चेन्नईने हा व्हिडीओ शेअर करताना याखाली एक कॅप्शन लिहिलेली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने लिहिले आहे की, " हा व्हिडीओ पाहून आपण आपले हास्य रोखू शकतो, का? अजिबातच नाही..."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nXlLzV
No comments:
Post a Comment