नवी दिल्ली: टी-२० आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर नियमानुसार पाकिस्तान संघातील सर्व खेळाडू आणि अन्य सदस्यांची करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. वाचा- पाकिस्तान संघातील सहा सदस्यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. न्यूझीलंड गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार ख्राइस्टचर्चमध्ये असलेल्या पाकिस्तान संघातील सहा जणांना करोना झाला आहे. पाकिस्तान संघातील या सहा जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. करोना निकाल पॉझिटिव्ह आल्याने पाकिस्तान संघाला याआधी देण्यात आलेल्या सरावाची परवाानगी आता नाकारण्यात आली. वाचा- न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. संघ सदस्यांमध्ये मोठ्या संख्येने करोना बाधीत आढळल्याने काळजीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाक संघ लाहोरमधून निघताना सर्वांची करोना चाचणी झाली होती. तेव्हा सर्वांचा रिपोर्ट नेगेटिव्ह होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाक संघातील कोणाला करोना झाला आहे याची माहिती सार्वजनिक केली नाही. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार पाक संघातील काही सदस्यांनी आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन केले होते. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fNid0t
No comments:
Post a Comment