नवी दिल्ली: कधी कधी अनावधानाने चूकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होतो. सध्या सोशल मीडियाच्या काळात तर अशा गोष्टी व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. अशीच घटना यांच्यातील सामन्यात घडली. वाचा- ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्टने सिडनी येथे सुरू असेलल्या पहिल्या वनडे सामन्यात समालोचन करताना मोठ चूक केली. त्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले. गिलख्रिस्टची चूक भारतीय चाहत्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागितली. वाचा- वाचा- काही दिवसांपूर्वी भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. सामना सुरू असताना गिलख्रिस्टने फॉक्स चॅनवर समालोचन करताना अनावधानाने सिराजच्या ऐवजी नवदीप सैनीच्या वडिलांचे निधन झाले सा उल्लेख केला. तेव्हा भारतीय चाहत्यांनी त्याला सुनावण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि गिलख्रिस्टला चूक दाखवून दिली. त्यावर गिलख्रिस्टने चूक मान्य केली आणि माफी मागितली. ज्या भारतीय चाहत्याने चूक दाखवून दिली त्याचे आभार देखील मानले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fGy28U
No comments:
Post a Comment