मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा पाय खोलात असल्याचे सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. त्यामुळे गांगुली यांच्यावर मोठी कारवाई हो शकते, असे म्हटले जात आहे. पण गांगुली यांनी नेमकी कोणती चुक केली आहे, पाहा... गांगुली ही बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी क्रिकेटशी निगडीत फक्त तेच काम करायला हवे, पण तसं करताना गांगुली दिसत नाहीत. गांगुली हे सध्याच्या घडीला क्रिकेट फँटसी लीगचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे. त्याचबरोबर गांगुली काही जाहीरातीही करताना दिसत आहेत. त्यामुळे गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना या गोष्टी कशा करू शकतात, असा सवाल आता विचारला जात आहे. भारताचे महान इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी या गोष्टीवर आता बोट ठेवले आहे. त्यामुळे जर कोणी गांगुली यांची तक्रार केली तर त्यांचा पाय खोलात जाऊ शकतो. गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्येही ते आपल्याला युएईमध्ये पाहायला मिळाले होते. त्याचवेळी एक अॅप जे क्रिकेटशी संबंधित आहे आणि त्यावर कोणता खेळाडू आज चांगली कामगिरी करेल याचे गुणांकन केले जाते, त्याची जाहिरात गांगुली कसे करू शकतात, हा सध्याच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही एवढे मोठे क्रिकेट संघटनेमध्ये पद भूषवत असताना तुम्ही कसे काय क्रिकेट लीगची जाहिरात करू शकता, असा सवालही आता चाहते विचारायला लागले आहेत. त्यामुळे जर गांगुली यांची कोणी तक्रार केली तर त्यांच्यापुढे मोठी समस्या उभी राहू शकते. त्याचबरोबर चाहत्यांचा रोषही त्यांच्यावर ओढवू शकतो. त्यामुळे आता गांगुली नेमकं कोणतं पाऊल उचलणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. गुहा यांची गांगुलीवर यांच्यावर नेमकी काय टीका केली, पाहा...गुहा यांनी यावेळी बीसीसीआये अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली आहे. गुहा म्हणाले की, " बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आहेत. पण ते सध्याच्या घडीला क्रिकेट फँटसी लीगचे प्रतिनिधीत्व करत आहेत. माझ्यामते ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटपटूंना केवढे पैसाचे अमीष आहे, हे या गोष्टीमुळे सर्वांसमोर येत आहे. अतिरीक्त पैसे कमावण्यासाठी गांगुली यांनी ही गोष्ट करणे योग्य आहे का? जर बीसीसीआयचे अध्यक्षच असे काम करत असतील तर क्रिकेट मंडळामध्ये काय चालत असेल, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2J6ZMHO
No comments:
Post a Comment