नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज आणि जलद गोलंदाज अद्याप फिट नसल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार पैकी पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम वनडे आणि मग टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होईल. वाचा- क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. या दोन्ही खेळाडूंना वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देत कसोटी संघात स्थान दिले होते. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत. एनसीएमध्ये वैद्यकीय पथक त्यांच्या फिटनेसवर काम करत आहे. वाचा- इशांत शर्मा बद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, टी-२० मध्ये फक्त चार ओव्हर टाकायच्या असतात. तो फिट आहे पण कसोटी मालिकेत दिर्घकाळ गोलंदाजी करावी लागते. अशा परिस्थितीत इशांत शर्मा धोकापत्करू शकत नाही. रिपोर्टनुसार रोहित शर्मा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवास करू शकतो. कारण अद्याप तो पूर्णपणे फिट नाही. रोहितला अजून दोन आठवडे रिहॅबमध्ये रहावे लागले. त्यानंतर एनसीए त्याच्या बाबत निर्णय घेऊ शकेल. वाचा- रोहित शर्मा जर ८ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवान झाला तर येथील नियमानुसार त्याला दोन आठवडे क्वारंटाइन रहावे लागेल. तो २२ डिसेंबरपासून सराव करू शकेल. दुसऱ्या बाजूला पहिल्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहली भारतात परत येणार आहे. अशा परिस्थितीत कसोटी संघात श्रेयस अय्यरचा समावेश होण्याची चर्चा आहे. तो सध्या वनडे आणि टी-२० संघात आहे. रोहित आणि इशांतच्या फिटनेस स्टेटसवर एक बैठक झाली होती. या दोघांच्या फिटनेसमध्ये फार सुधारणा नाही. याबाबत संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि बीसीसीआयला माहिती देण्यात आली आहे. कालच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांत कसोटी मालिकेत खेळतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m4wo3l
No comments:
Post a Comment