सिडनी : ऑस्ट्रेलियाने पहिल्याच एकदिवसीय सामन्याच भारतावर ६६ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यातऑस्ट्रेलियाचा एक जोरदार धक्काही बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो यापुढील सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गोलंदाजी करताना असताना ही गोष्ट पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचे ३३वे षटक सुरु होते. अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हे षटक टाकत होता. पण या षटकातील फक्त दोनच चेंडू मार्कसला टाकता आले. दोन चेंडू टाकल्यावर मार्कसला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मार्कसची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले जात आहे. कारण त्यानंतर मार्कस हा मैदानात आलेला दिसला नाही. या षटकातील उर्वरीत चार चेंडू ग्लेन मॅक्सवेलने टाकले आणि हे षटक पूर्ण केले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसरा एकदिवसीय सामना हा २० नोव्हेंबरला होणार आहे, म्हणजेच रविवारी ही लढत होणार आहे. त्यामुळे मार्कसला दुखापतीमधून सारवण्यासाठी फारच कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे ही दुखापत जर गंभीर स्वरुपाची असेल तर दुसऱ्या सामन्यात मार्कसला खेळवण्याची जोखीम ऑस्ट्रेलियाचा संघ उचलणार नाही. करोनानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवत ३७४ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग कराताना भारताचे चार फलंदाज १४ षटकांत बाद झाले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यांनी यांनी चांगली भागीदारी रचली. पण भारताचा पराभव मात्र ते टाळू शकले नाहीत. यजमान ऑस्ट्रेलियाने पाहूण्या भारतीय संघाचे धमाकेदार स्वागत केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३७५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HIn3iT
No comments:
Post a Comment