Ads

Friday, November 27, 2020

AUS vs IND: फक्त भारताच्या एका दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलिया होणार मालामाल, पाहा किती करोडो रुपये कमावणार...

सिडनी, : : आजपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली. पण या दौऱ्यातून ऑस्ट्रेलियाला अब्जावधींचा नफा होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक आयोजनकरनही कदाचित जेवढा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला नसता तेवढा फायदा त्यांना फक्त भारताच्या एका दौऱ्यातून मिळणार आहे. करोनानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला जवळपास ६२० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी क्रिकेट मंडळातील काही जणांना डच्चू दिल्याचेही पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने करोनामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द केला, पण त्यांनी भारताचा दौरा मात्र रद्द केला नाही. त्यांना काही करून भारताचा दौरा आयोजित करायचा होता, त्यामागे असलेले अर्थकारण आता समोर येत आहे. भारताच्या दौऱ्यातून ऑस्ट्रेलियाला जवळपास १६५० कोटी रुपये मिळणार असल्याचे क्रिकेट अभ्यासकांना वाटत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने करोनानंतर पहिल्यांदा भारताच्याा दौऱ्यालाच प्राथमिकता दिली होती. भारताचा दौरा ज्या देशात होतो त्यावेळी त्यांना जाहिरातीही जास्त मिळतात. त्याचबरोबर प्रसारणाचे हक्कही मोठ्या किमतीला विकले जातात. या सर्व गोष्टी पाहिल्या तर अन्य कोणताही संघ दौऱ्यावर आल्यावर एवढा फायदा कोणत्याही देशाला होत नसतो. त्यामुळे आपली घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळापुढे भारतीय दौऱ्याचा सर्वोत्तम मार्ग होता. त्यामुळेच सर्व सुरक्षिततेच्या उपायांनाही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने खर्च केला आहे. पण सर्व खर्च वगळला तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला भारताच्या एका दौऱ्यातून १६५० कोटी रुपये मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियासाठी भारताचा दौरा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असल्याचे आता समोर आले आहे. भारताच्या दौऱ्यातील कमाईनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाचा आर्थिक गाडा चांगल्यापद्धतीने चालू शकतो, असेही म्हटले जात आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा जवळपास दीड महिने चालणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fFKcyR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...