नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउडर हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत तब्बल एक वर्षानंतर गोलंदाजी केली. भारतीय संघाकडून सामन्यात सर्वात चांगली गोलंदाजी हार्दिकने केली. त्याने ४ षटकात फक्त २४ धावा देत शतक करणाऱ्या स्टीव्ह स्मिथची महत्त्वाची विकेट घेतली. हार्दिकच्या या गोलंदाजीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाची एक महत्त्वाची काळजी कमी झाली. वाचा- दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्याच बरोबर भारताने मालिका गमावली. हार्दिकच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला असला तरी याचा फायदा मात्र ऑस्ट्रेलियाने करून घेतला. त्याच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला गोलंदाजीची ब्ल्यूप्रिंट मिळाली, ही गोष्टी स्वत: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच याने सांगितले. वाचा- हार्दिक पांड्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. त्यावरून आमच्या संघातील गोलंदाजांनी काही गोष्टी शिकल्या. आम्हाला चेंडूचा वेग कमी करावा लागला. त्याचा संघाला फायदा झाला. हार्दिकमुळे ब्लूप्रिंटच मिळाली आहे. हार्दिकची गोलंदाजी आधी स्ट्राइडला असायची. आता दुसऱ्या वनडेत तो उसळी घेणारे चेंडू टाकत होता. शरीरावर पडणारे वजन कमी करण्यासाठी त्याने हे केले. वाचा- भारताचा उपकर्णधार केएल राहुल याने देखील हार्दिकच्या गोलंदाजीचे कौतुक केले. त्याच्या गोलंदाजीमुळे संघ आणि कर्णधारावरील दबाव थोडा कमी होतो. दुसऱ्या वनडेत जेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा हार्दिकने विकेट घेऊन भारताला ब्रेक मिळवून दिला. वाचा- एक वर्षापूर्वी हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. सामना झाल्यानंतर तो म्हणाला, मी महत्त्वाच्या सामन्यात आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा गोलंदाजी करेन. शरीरावर पडणारा भार कमी करण्यासाठी गोलंदाजीच्या शैलीत थोडा बदल केला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mmZyL3
No comments:
Post a Comment