मुंबई, : रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका खेळू शकणार नाही, असे म्हटले जात होते. पण आता रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्यासाठी एक आनंदाची बाती आली आहे. आता रोहित आणि इशांत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका खेळू शकतील, कारण आता बीसीसीआयने या प्रश्नात लक्ष घालायचे ठेरवले आहे. त्यामुळे बीसीसीआय आता या प्रश्नावर तोडगा काढणार आहे. रोहित आणि इशांत यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबर संवाद साधायलाही बीसीसीआय तयार असल्याचे समजते आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, " बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या सातत्याने संपर्कात आहे. रोहित आणि इशांत यांचा क्वारंटाइनचा कालावधी कमी केला तर हे दोघेही सराव सामन्यातही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबरही संवाद साधणार आहे. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने परवानगी देत रोहित आणि इशातं यांचा क्वारंटाइन कालावधी कमी केला तर हे दोघे पूर्ण कसोटी मालिकाही खेळू शकतील." रोहित आणि इशांतला फिट व्हायला किती कालावधी लागू शकतो, पाहा... रोहित आणि इशांत यांना आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. या दोघांच्या दुखापती आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये लक्ष ठेवले जात आहे. रोहित आणि इशांत हे दोघेही सराव करताना पाहायला मिळाले आहेत. पण सामन्यासाठी फिट होण्यासाठी या दोघांना तीन आठवड्यांचा कालावधी द्यावा लागेल, असे म्हटले जात आहे. त्यानंतरच या दोघांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता रोहित आणि इशांत यांच्याकडे फार मोठा कालावधी नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहित आणि इशांत हे फिटनेस चाचणीमध्ये जेवढ्या लवकर पास होतील, तेवढ्या लवकर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येईल. पण रोहित आणि इशांत जोपर्यंत फिट होत नाहीत, तोपर्यंत बीसीसीआयदेखील त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याबाबत ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबर संवाद साधू शकणार नाही. त्यामुळे रोहित आणि इशांत हे दोघे कधी पूर्णपणे फिट होतात, याकडेच सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nWcZlH
No comments:
Post a Comment