नवी दिल्ली: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतकी भागिदारी करून शानदार सुरूवात करून दिली. यामुळेच त्यांना ३५०च्या पुढे धावसंख्या उभी करता आली. वाचा- ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली असली तरी दुसऱ्या वनडेत त्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वनडेत भारताची फलंदाजी सुरू असताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या ऐवजी डार्सी शॉर्ट हा क्षेत्ररक्षणासाठी आला. या शिवाय जलद गोलंदाज पॅट कमिन्सला देखील विश्रांती देण्यात आली आहे. वनडे मालिकेतील अखेरची लढत २ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे होणार आहे. वाचा- भारताविरुद्धच्या दोन्ही लढतीत वॉर्नरने अर्धशतक झळकावले होते. त्याने फिंच सोबत पहिल्या वनडेत १५६ धावा तर दुसऱ्या वनडेत १४२ धावांची भागिदारी केली होती. भारतीय संघाच्या फलंदाजी वेळी चौथ्या षटकात एक चेंडू पकडताना वॉर्नरला दुखापत झाली. त्याला ग्रोइन स्ट्रेनची दुखापत झाल्याचे कळते. सामना सुरू असातना स्कॅनिंगसाठी तो स्टेडियमधून गेला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार वॉर्नर तिसरी वनडे आणि टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. वाचा- शिखर धवनने मारलेला एक शॉट रोखण्यासाठी वॉर्नरने डाइव्ह मारला आणि तेव्हाच त्याला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या फिजिओच्या मदतीने वॉर्नर मैदानाबाहेर गेला. दुसऱ्या वनडेत वॉर्नरने ७७ चेंडूत ८३ धावा केल्या. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. पहिल्या वनडेत देखील वॉर्नरने ७६ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JpcK3C
No comments:
Post a Comment