सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्याने सामान संपल्यावर संघातील खेळाडूंची सर्वांसमोरच चांगली शिकवणी घेतली. भारतीय संघातील खेळाडूंबाबतच कोहलीने काही प्रश्न उपस्थित केले आहे. कोहली या सामन्यानंतर म्हणाला की, " सामन्याच्या २५ षटकांनंतर भारतीय संघातील खेळाडूंची देहबोली ही निराशानजक होती. त्यामुळे सामन्याच्या २५ षटकांनंतर आमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. भारताच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना काही झालेल्या चुका भारतासाठी भारी पडल्या. त्यामुळे हा पराभव झाला आहे, असे मला वाटते. या सामन्याच्या तयारीसाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला होता. त्यामुळे याप्रकारचे कोणतेही कारण मी पराभवासाठी देऊ शकत नाही." या सामन्यात भारताच्या खेळाडूंकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या सामन्यात शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांच्याकडून काही सोपे झेल सुटले आणि याचाच फटका भारतीय संघाला या सामन्यात बसल्याचे पाहायला मिळाले. यापुढे कोहली म्हणाला की, " आम्ही बऱ्याच कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत आहोत. काही दिवस आम्ही ट्वेन्टी-२० सामने खेळलो होतो, त्यामधून खेळाडू अजूनही बाहेर आलेले नाहीत, असे मला तरी वाटते. पण सामन्याच्या २५ षटकांनंतर आम्ही क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका केल्या, या चुका आम्हाला महागात पडल्या. त्याचबरोबर गोलंदाजी करताना जास्त विकल्प माझ्या हातामध्ये नव्हते, त्याचा फटकाही आम्हाला बसला. ऑस्ट्रेलियाकडून ही जबाबदारी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी पार पाडली. पण आमच्याकडे मात्र गोलंदाजीमध्ये जास्त पर्याय उपलब्ध नव्हते." करोनानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवत ३७४ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग कराताना भारताचे चार फलंदाज १४ षटकांत बाद झाले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यांनी यांनी चांगली भागीदारी रचली. पण भारताचा पराभव मात्र ते टाळू शकले नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fGeJwm
No comments:
Post a Comment