नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे चर्चेत राहिलेला भारताचा स्टार फलंदाज सध्या स्वत:ला फिट करण्याच्या तयारीत आहे. जवळपास एक महिन्यानंतर सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रोहितने संघ व्यवस्थापनासमोर एक पर्याय ठेवला आहे. वाचा- रोहितने कसोटीत सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत तो संघाच्या गरजेनुसार मधळ्याफळीत फलंदाजी करण्यास तयार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशात परत येणार आहे. तेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह रोहित मोठी भूमिका बजावू शकतो. वाचा- मी तेच बोलणार जे याआधी म्हटले होते. भारतीय संघ मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगेल त्या ठिकाणी मी फलंदाजी करेन. मला माहिती नाही की मी सलामीला फलंदाजी करण्यास येईन की अन्य कोणत्या क्रमांकावर. रोहित सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. तेथे ट्रेनिंग पूर्ण करून तो ऑस्ट्रेलियात दाखल होईल. तोपर्यंत भारतीय संघ त्याची भूमिका निश्चित करेल. युएईत पार पडलेल्या आयपीएल स्पर्धे दरम्यान त्याला किरकोळ हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यावरून बराच वाद झाला होता. वाचा- मला पूर्ण विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियात पोहोचलेले संघ व्यवस्थापन कर्णधार विराट कोहली भारतात परतल्यानंतर कोणता खेळाडू नेतृत्व करेल याची निवड करतील. मी एकदा ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर स्पष्ट होईल की मला काय करायचे आहे. संघाला ज्या स्थानावर मी फलंदाजी करावी वाटते त्या स्थानावर मी फलंदाजी करेन. वाचा- हुक आणि पुल शॉट खेळण्यात रोहित माहीर आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर चेंडू उसळी अधिक घेतो. पण कधी कधी ही गोष्टी इतकी खरी ठरत नाही जितकी सांगितली जाते. आपण चेंडूच्या उसळी घेण्याबद्दल बोलत असतो. पण पर्थ वगळता अन्य मैदानावर (एडिलेड, मेलबर्न, सिडनी) मला वाटत नाही की इतकी उसळी मिळत असेल, असे रोहित म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35T3DkB
No comments:
Post a Comment