नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला उद्या म्हणजे २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडूंची जोरदार तयारी सुरू असून काही खेळाडू करोना व्हायरसमुळे हॉटेल रुममध्ये सराव करत आहेत. वाचा- भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार देखील हॉटेल रुममध्ये सराव करत आहे. ज्यावर भारतीय संघातील गब्बर शिखर धवनने त्याला ट्रोल केले आहे. अजिंक्यने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो रुममध्येच सराव करताना दिसत आहे. आज नेटमध्ये सराव नाही. पण मी फलंदाजीच्या सरावासाठी मार्ग शोधला आहे. मी बॅटपासून दूर जाऊ शकत नाही. माफ करा शेजाऱ्यांनो! वाचा- अजिंक्यच्या या व्हिडिओ पोस्टवर शिखर धवनने प्रतिक्रिया दिली आहे. भावा, तु एक दिवसाचा सराव सामना खेळलास आणि त्यात तू ५० धावा केल्यास. पण त्याचा फायदा काय? वाचा- याआधी शिखर धवनने ऑस्ट्रेलियातील मर्यादीत षटकाच्या सामन्यांसाठीच्या रेट्रो जर्सीचा फोटो शेअर केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या आणि हे सामने कुठे पाहाल.... वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होतील) --- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरू होतील) --- सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी --- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33j4WY9
No comments:
Post a Comment