नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे भारता ऐवजी युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठी कमाई केली आहे. या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या २५ टक्के अधिक होती. इतक नव्हे तर आयपीएलच्या काळात १ हजार ८०० लोकांच्यात ३० हजारहून अधिक करोनासाठीची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट घेण्यात आली. विशेष म्हणजे या आयपीएल सुरू झाल्यानंतर एकाही व्यक्तीला करोना झाला नाही. बीसीसीआयने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. वाचा- बीसीसीआयने आयपीएलच्या १३व्या हंगामाच्या आयोजनातून ४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२०चा हंगाम पार पडल्यानंतरची ही आकडेवारी आहे. करोना काळात भारतातील एखाद्या संघटनेकडून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी स्पर्धा होती. धूमल यांनी बीसीसीआयला किती नफा झाला याची माहिती मात्र दिली नाही. वाचा- भारतात करोना व्हायरसचे प्रमाण अधिक असल्यामुळे १० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात दुबई, अबुधाबी आणि शारजा या युएईमधील तीन मैदानावर आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या कठीण काळात ही स्पर्धा दोन महिने चालली. जगातील इतक काही स्पर्धांमध्ये खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त येत होते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोवाक जोकोविच याला देखील करोना झाल्याचे समोर आले होते. जेव्हा जोकोविचला करोना झाल्याचे समजल्यावर आम्ही थोडे गोंथळात पडलो. अनेकांनी आम्हाला आयपीएलचे आयोजन करू नका असा सल्ला दिला, असे धूमल म्हणाले. वाचा- जर एखाद्या खेळाडूला काही झाले तर तुम्हा काय कराल? असा सवाल प्रत्येक जण विचारत होते. पण जय शाहा यांनी ठामपणे आयोजन करावे अशी भूमिका घेतली. बोर्डातील अन्य लोकांपेक्षा त्यांना अधिक आत्मविश्वास होता. गेल्या आयपीएलच्या तुलनेत आम्ही खर्चात ३५ टक्के इतकी कपात करू शकलो, असे त्यांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UPJOEe
No comments:
Post a Comment