सिडनी, : विराट कोहली ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका पूर्ण खेळणार नाही. पहिला कसोटा सामना झाल्यावर कोहली भारतामध्ये परतणार आहे. कोहलीच्या घरी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार असून त्यासाठी कोहली मायदेशी परतणार आहे. पण आता कोहलीबरोबर हार्दिक पंड्यालाही आपल्या घरी जायची घाई लागली आहे. याबाबतचा हार्दिकचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात हार्दिकने ९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पण या सामन्याटनंतर हार्दिकचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायर होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला लवकर घरी जायचे आहे, असे हार्दिक म्हणत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक म्हणाला की, " मी जेव्हा घराबाहेर पडलो होतो तेव्हा माझा मुलगा १५ दिवसांचा होता. आता मी जेव्हा घरी जाईन तेव्हा तो चार महिन्यांचा झाला असेल. मुलगा झाल्यावर माझ्यामध्येही बरेच बदल झाले आहे. बाळ झाल्यावर तुमची जबाबदारी वाढते, काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मला मुलाची आठवण येत आहे. त्यामुळेच मी कधी लवकर घरी जातो, असे मला वाटत आहे." हार्दिक घरातून जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याला मुलगा हा फक्त १५ दिवसांचा होता. हार्दिक पहिल्यांदा युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला. जवळपास दिड महिना आयपीएल रंगली होती. त्यानंतर युएईमधून हार्दिक भारतीय संघाबरोबर थेट ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला. आता ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यावरच हार्दिकला आपल्या मुलाला भेटता येणार आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पण भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी का दिली नसल्याचे पाहायला मिळाले. पण हार्दिक पंड्या गोलंदाजी नेमकी करणार तरी कधी, याचे उत्तर आता मिळाले आहे. याबाबत विचारल्यावर हार्दिकने सांगितले की, " आपण कधीही मोठे लक्ष्य डोळ्यापुठे ठेवायला हवे. आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि महत्वाच्या स्पर्धांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या मोठ्या स्पर्धांमध्ये माझी गोलंदाजी महत्वाची ठरेल. त्यामुळे सध्याच्या घडीला मी त्या गोष्टीवर काम करत आहे. मला अधिक वेगवान गोलंदाजी करायची आहे. त्यासाठी मी सध्याच्या घडीला काही गोष्टींवर भर देत आहे. पण योग्यवेळ आल्यावर मी नक्कीच गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेन."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36fzcFf
No comments:
Post a Comment