सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात प्रेक्षकांना देखील सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कोरनामुळे फक्त ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना एक घटना घडील ज्याचा भारतातील एका उद्योग समूहाशी संबंध होता. सामना सुरू असताना काही लोकांनी मैदानात प्रवेश केला आणि अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील प्रकल्पाबद्दल निदर्शने केली. वाचा- अदानींच्या प्रकल्पाबद्दल ऑस्ट्रेलियात गेल्या काही काळापासून विरोध सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असेलल्या वनडे सामन्यात देखील हा विरोध पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या षटाकात काही लोक सुरक्षा रक्षकांना चकवा देत मैदानात आले आणि त्यांनी प्रकल्पाबद्दल फलक दाखवून निदर्शने केलीत. या फलकावर 'भारतीय स्टेट बँक आणि नो १ बिलियन डॉलर अदानी' लोन असे इंग्रजीमध्ये लिहले होते. संबंधित निदर्शने करणाऱ्या लोकांच्या शर्टवर #STOPADANI आणि “Stop Coal. #StopAdani. Take Action” असे लिहले होते. वाचा- या लोकांना सुरक्षा रक्षकांनी तातडीने मैदानाबाहेर नेले. मैदानात येऊन अशा प्रकारे निदर्शने करण्याची ही पहिली वेळ नाही. आजच्या सामन्यातील या निदर्शनांची चर्चा पुढील काही दिवस होण्याची शक्यता आहे. पण याच बरोबर सामन्यातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. करोना काळात बायो सुरक्षित वातावरणात अशा प्रकारे प्रेक्षकांनी येणे धोकादायक ठरू शकते. या वर्षी सप्टेंबर महिन्यात अदानी उद्योग समूहाने ऑस्ट्रेलियातील पर्यावरण कार्यकर्त्यांच्या सोबतची न्यायालयीन लढाई जिंकली होती. अदानींच्या कोळसा प्रकल्पाला अनेक जण विरोध करत आहेत. अदानी समूहाने क्विंसलँड प्रांतातील १ हजार ५०० लोकांना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fEpWxA
No comments:
Post a Comment