मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी हा येणारा शुक्रवार सर्वात खास असणार आहे. कारण या शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना तब्बल तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. सहा देश शुक्रवारी मैदानात उतरणार असल्याचे आता चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या शुक्रवारी म्हणजेच २७ नोव्हेंबरला तीन आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणार आहे. २७ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची बाधा झाली होती. पण त्यानंतरही इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतलेला नाही. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा २७ नोव्हेंबरला रंगणार आहे. हा सामना केपटाऊन येथे होणार आहे. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्येही पहिला ट्वेन्टी-२० सामना २७ नोव्हेंबरलाच खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडमध्ये वेस्ट इंडिजचा संघ दाखल झाला आहे. त्यामुळे २७ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. पहिल्या एकदिवीय सामन्यापूर्वी भारताच्या संघापुढे दोन महत्वाच्या समस्या असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाला २७ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी या समस्यांवर तोडगा भारतीय संघाला काढाला लागणार आहेत. भारतीय संघापुढे पहिली समस्या आहे की, लोकेश राहुलला नेमक्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे. कारण आयपीएलमध्ये राहुलने सलामीला येत धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे सलामीला आल्यानंतर राहुल चांगल्या फॉर्मात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे राहुलला सलामीला पाठवायचे की कोणत्या क्रमांकावर खेळवायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. भारताच्या संघापुढे दुसरी समस्या आहे की, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणत्या एका फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे. भारतीय संघासाठी दुसरी समस्या थोडी सोपी वाटत असली तरी पहिली समस्या सोडवणे भारतीय संघासाठी कठीण दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fv3Qh2
No comments:
Post a Comment