सिडनी, : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला नाही. या सदस्याचा करोना चाचणीचा अहवाल चुकीचा आला होता. त्यामुळे त्याच्याबाबत नेमकं काय झालं आहे, याचे उत्तर मात्र मिळताना दिसत नाही. भारतीय संघातील सदस्य असलेला थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघु अजुनपर्यंत भारतीय संघाबरोबर सरावात सहभागी झालेला नाही. रघुची करोना चाचणी झाली होती. त्यामध्ये तो करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियामध्ये उशिरा दाखल झाला होता. त्यानंतर रघुला सिडनी येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. आतापर्यंत रघु भारतीय संघाबरोबर सरावात सहभागी व्हायला हवा होता, पण असे होऊ शकले नाही. कालांतराने रघुचा करोना चाचणीचा अहवाल चुकीचा असल्याचे समोर आले होते. इनसाइड स्पोर्ट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार रघु यांची करोना चाचणी झाली होती. त्यामध्ये रघु हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर रघुचा करोना अहवाल चुकीचा असून त्याला करोना झालेला नाही, ही गोष्ट पुढे आली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड' आणि 'द एज' या वर्तमानपत्रांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक मौलिन पारेख यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना पारेख यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्याचबरोबर न्यू साउथ वेल्सच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्तांनीही रघु यांच्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळेच नेमकी समस्या काय आहे, हे अजून समजू शकलेले नाही. रघु 150 किमी. प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकून भारतीय फलंदाजांना सराव देत असतो. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या यशामध्ये रघुचे योगदान असल्याचे म्हटले होते. पण अजूनही रघूबाबत कोणीही माहिती पुढे आलेली नाही. त्याचबरोबर रघु अजून सरावाला का येऊ शकला नाही आणि तो नेमका कुठे आहे, हेदेखी सध्याच्या घडीला कोणी सांगताना दिसत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36aolg1
No comments:
Post a Comment