नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दाखल झाला असून येत्या २७ तारखेला वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होत आहे. ३ सामन्यांची वनडे मालिका झाल्यावर ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या दोन मालिका झाल्यानंतर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका होईल. भारताचा स्टार खेळाडू याला दुखापतीमुळे वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघात स्थान दिले नाही. त्याच बरोबर देखील दुखापतीमुळे या मालिका खेळू शकणार नाही. वाचा- रोहित आणि इशांत या दोघांचा कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिट होण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक यांनी रोहित आणि इशांत यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. जर हे दोन खेळाडू आठवड्याभरात ऑस्ट्रेलियात दाखल झाले नाही तर त्यांचे कसोटी मालिका खेळणे अवघड होईल. वाचा- एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, NCA मध्ये रोहित शर्माच्या काही टेस्ट झाल्या आहेत. या टेस्टनंतर निश्चित होईल की त्याला किती मोठ्या विश्रांतीची गरज आहे. जर त्याला मोठी विश्रांती दिली तर अडचण होऊ शकते. कारण मग त्याला पुन्हा क्वारंटाइनमध्ये जावे लागले. त्यामुळे त्याच्या कसोटी खेळण्यात अडचणी येऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार १४ दिवसांचा क्वारंटाइन आवश्यक आहे. दोन्ही संघातील पहिली कसोटी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. तर ११ डिसेंबरपासून सराव सामने होणार आहेत. जर १० डिसेंबरपर्यंत क्वारंटाइनमधून बाहेर यायचे असेल तर या दोघांना २६ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात यावे लागले. वाचा- आम्हाला हे पाहावे लागले की रोहितला किती मोठ्या विश्रांतीची गरज आहे. रोहित वनडे आणि टी-२० मालिका खेळणार नाही. रोहितला मोठी विश्रांतीची गरज असेल तर ते संघासाठी हिताचे नसले. कसोटी खेळायची असेल तर ३ ते ४ दिवसात ऑस्ट्रेलियात पोहोचावे लागले, नाही तर होईल. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33qyvHF
No comments:
Post a Comment