सिडनी : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यावर असताना पृथ्वी एका अभिनेत्रीच्या डान्सच्या व्हिडीओवर घायाळ झालेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रसोबत पृथ्वीचे नाव जोडले जात आहे. आयपीएलमध्ये पृथ्वीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच त्याला संघातून डच्चूही देण्यात आला होता. दिल्ली कॅपिटल्सचा संघ यावर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण या महत्वाच्या सामन्यात पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे पृथ्वीने सोशल मीडियावर जास्त काळ न राहता क्रिकेटवर लक्ष केंद्री करावे, अशी टीका भारताच्या माजी कर्णधारांनीही केली होती. पण त्यानंतरही पृथ्वी हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पृथ्वी प्राची सिंग या अभिनेत्रीबरोबर डेटिंग करत असल्याचे म्हटले जात आहे. हे दोघेही एकमेकांच्या व्हिडीओ किंवा फोटोंना प्रतिसाद देताना पाहाला मिळत आहेत. ही गोष्ट फक्त एकदा घडलेली नाही तर वारंवार ही गोष्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पृथ्वी आणि प्राची सिंग यांचे अफेअर सुरु आहे, अशा चर्चांना उत आला आहे. प्राचीने आपल्या बॅले डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओला लगेचच पृथ्वीने लाइक केल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी पृथ्वीने आयपीएल खेळत असतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटो आणि व्हिडीओंना प्राचीने लाइक केले होते, त्याचबरोबर काही कमेंट्सही केल्या होत्या. या कमेंट्स पाहूनच प्राची आणि पृथ्वी यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याचे चाहत्यांनी म्हटले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lZCWjA
No comments:
Post a Comment