सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच सामन्यात भारतीय संघाल दंड देखील झालाय. वाचा- शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना मॅच फीच्या २० टक्के इतका दंड झालाय. या सामन्यात भारताने ५० षटके टाकण्यासाठी ४ तास ६ मिनिटे इतका वेळ घेतला. भारतीय गोलंदाजांनी निश्चित केलेल्या वेळेत ओव्हर टाकल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी भारतीय संघातील खेळाडूंना हा दंड केला. वाचा- आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक संघाला निश्चित वेळेत गोलंदाजी करावी लागते. जर ते झाले नाही तर नियम २.२२ नुसार कारवाई केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही चूक मान्य केली असून दंड स्विकार केलाय. हा सामना झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने देखील मान्य केली की त्याने खेळलीही वनडेमधील ही सर्वात मोठी मॅच होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KT8DxH
No comments:
Post a Comment