मुंबई: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीवर बरीच चर्चा झाली. रोहित शर्माला संघात स्थान न दिल्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याच बरोबर मुंबईकडून खेळणारा सूर्यकुमार यादवला अद्याप संधी का दिली गेली नाही यावर देखील माजी क्रिकेटपटू आणि अन्य लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता जागतिक क्रिकेटमधील एका दिग्गज खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात हवा होता असे मत व्यक्त केले आहे. वाचा- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज ( ) याने सूर्यकुमार यादवला () भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे होते असे मत व्यक्त केले. येत्या शुक्रवारपासून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होतोय. सूर्यकुमारने प्रथम श्रेणीच्या ७७ सामन्यात ४४.०१च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. तर १६५ टी-२० सामन्यात ३२.३३च्या सरासरीने ३ हजार ४९२ धावा केल्या आहेत. वाचा- नुकत्याच युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात देखील सूर्यकुमारने शानदार कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्सला मिळालेल्या पाचव्या विजेतेपदामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारने १५ सामन्यात १४५.०१च्या सरासरीने ४८० धावा केल्या. पण अद्याप त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. वाचा- लाराने सूर्यकुमारचे कौतुक केले. तो निश्चितपणे एक दर्जेदार खेळाडू आहे. फक्त धावा नव्हे तर त्याच्याकडे फलंदाजीचे तंत्र आहे. दबावाच्या परिस्थितीत खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच बरोबर तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो ते देखील महत्त्वाचे आहे. वाचा- सूर्यकुमार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांच्यानंतर फलंदाजीला येतो. क्रमांक तीनवरचा तो सर्वात भरवश्याचा फलंदाज आहे. त्यामुळेच मला वाटते की तो भारतीय संघात हवा, असे लारा म्हणाला. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. २७ तारखेपासून तीन सामन्यांची वनडे त्यानंतर तितक्याच सामन्याची टी-२० मालिका होणार आहे. तर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fotlAq
No comments:
Post a Comment