सिडनी : आजच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पण भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी का दिली नाही, यााबाबतचा मोठा खुलासा आज भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.चहल- १० षटकात ८९ धावा जडेजा- १० षटकात ६३ धावा सैनी- १० षटकात ८३ धावा बुमराह- १० षटकात ७२ धावा शमी- १० षटकात ५९ धावा हार्दिक पंड्याबाबत कोहली नेमकं काय म्हणाला, पाहा...भारतीय गोलंदाजांच्या धुलाईनंतरही पंड्याला गोलंदाजी का दिली नाही, याबाबत कोहली म्हणाला की, " दुर्देवाने हा गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याचबरोबर माझ्याकडे अन्य कोणतेही गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध नव्हते. ऑस्ट्रेलियाकडे मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आहे. पण आमच्या सामन्याकडे असे कोणतेच पर्याय उपलब्ध नव्हते." याापूर्वी हार्दिकला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणूनही वापरण्यात आले आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकला गोलंदाजी करताना समस्या जाणवत आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही आपल्याला हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे हार्दिकला सध्याच्या घडीला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान न देता एक फलंदाज म्हणून स्थान देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्याने सामान संपल्यावर संघातील खेळाडूंची सर्वांसमोरच चांगली शिकवणी घेतली. भारतीय संघातील खेळाडूंबाबतच कोहलीने काही प्रश्न उपस्थित केले आहे. कोहली या सामन्यानंतर म्हणाला की, " सामन्याच्या २५ षटकांनंतर भारतीय संघातील खेळाडूंची देहबोली ही निराशानजक होती. त्यामुळे सामन्याच्या २५ षटकांनंतर आमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. भारताच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना काही झालेल्या चुका भारतासाठी भारी पडल्या. त्यामुळे हा पराभव झाला आहे, असे मला वाटते. या सामन्याच्या तयारीसाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला होता. त्यामुळे याप्रकारचे कोणतेही कारण मी पराभवासाठी देऊ शकत नाही."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fNW5D6
No comments:
Post a Comment