सिडनी, : भारताविरुद्धच्या सामन्यात स्टीव्हन स्मिथ हा दमदार फलंदाजी केल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. भारताविरुद्ध स्मिथने आतापर्यंत सहा शतके झळकावली आहेत. त्यामुळे स्मिथ हा भारतासाठी मोठा अडसर ठरू शकतो. पण स्मिथचा काटा लवकर कसा काढता येईल, यासाठी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक कानमंत्र दिला आहे. जर भारतीय गोलंदाजांनी सचिनचा हा कानमंत्र ऐकला तर स्मिथला त्यांना लवकर बाद करता येऊ शकते. सचिन म्हणाला की, " स्टीव्हन स्मिथचे जे फलंदाजीचे तंत्र आहे ते पारंपरिक नाही. कारण स्मिथची फलंदाजी करण्याची शैली वेगळीच आहे. त्यामुळे साधारणपणे गोलंदाज हे कोणत्याही फलंदाजाला चौथ्या स्टम्पवर (ऑफ स्टम्पच्या बाहेर) चेंडू टाकून बाद करायचा प्रयत्न करत असतात. पण स्मिथच्याबाबतीत तसे करून नक्कीच चालणार नाही. कारण स्मिथ हा फलंदाजी करताना ऑफ स्टम्पवर येतो आणि फटकेबाजी करतो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी स्मिथ फलंदाजी करत असताना पाचव्या स्टम्पवर चेंडू टाकावेत, जेणेकरून स्मिथच्या बॅटची कडा लागेल आणि स्मिथ लवकर बाद होईल." सचिन पुढे म्हणाला की, " स्मिथने यापूर्वीच सांगितले आहे की, तो उसळत्या चेंडूंचा सामना करायला सज्ज आहे. त्यामुळे स्मिथला वाटत असेल की तो फलंदाजी करत असताना गोलंदाज जास्त आक्रमक होतील. पण माल वाटते की, स्मिथला जर लवकर बाद करायचे असेल तर त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकायला हवेत. स्मिथला जेवढं बॅकफूटवर ठेवता येईल, तेवढं ते भारतीय गोलंदाजांसाठी नक्कीच चांगले असेल." भारतीय गोलंदाजीबद्दल सचिन नेमकं काय म्हणाला, पाहा...भारताकडे सध्याच्या घडीला चांगले गोलंदाज आहे. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, उमेश यादवसारखे अनुभवी गोलंदाज भारतीय संघात आहेत. पण जर भारताला कसोटी मालिका जिंकायची असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या २० विकेट्स घ्याव्या लागतील. पण या २० विकेट्स घेताना जास्त धावा देऊ नयेत. भारतीय गोलंदाजांनी थोडी बचावात्मक गोलंदाजीही करायला हवी. तुम्ही जेवढी निर्धाव षटके टाकाल, तेवढे दडपण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वाढत जाईल, असे सचिन म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33fFeUq
No comments:
Post a Comment