नवी दिल्ली: सिडनी क्रिकेट मैदानावर काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अशी खराब कामगिरी केली जी याआधी कधीच झाली नव्हती. भारतीय क्रिकेटने आतापर्यंत ९७८ सामन्याच्या इतिहासात जे कधी झाले नाही ते काल सिडनी मैदानावर झाले. वाचा- भारताविरुद्ध कोणत्या संघाने सलग तीन सामन्यात शतकी भागिदारी केली नव्हती. पण कालच्या लढतीत हा विक्रम गेला गेला. ऑस्ट्रेलियाने काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागिदारी केली. या दोघांनी सलग दुसऱ्यांदा शतकी भागिदारी केली. पहिल्या वनडेत या दोघांनी १५६ धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ही सलग तिसरी वेळ आहे जेव्हा पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी झाली. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९७८ वनडे सामन्यांच्या इतिहासात प्रथमच प्रतिस्पर्धा संघाने पहिल्या विकेटसाठी सलग तीन सामन्यात शतकी भागिदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन लढती आधी भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळली होती. त्या मालिकेतील अखेरच्या लढतीत न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल आणि हेनरी निकोलस या जोडीने १०६ धावा केल्या. ही लढत करोना व्हायरस सुरू होण्यापूर्वी झाली होती. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली. वॉर्नरने ७७ चेंडूत ८३ धावा केल्या. कर्णधार फिंचने ६९ चेंडूत ६० धावा केल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने सलग दुसरे शतक झळकावले. अखेरच्या १० ओव्हरमध्ये मार्नस लाबुशाने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o7BRXH
No comments:
Post a Comment