नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने तिच्या ३२व्या वाढदिवसा दिवशी अनेक गोष्टी शेअर केल्या. साक्षीने पती एम एस धोनीबद्दल अशा गोष्टी सांगितल्या ज्या आजपर्यंत कोणाला माहिती नव्हत्या. क्रिकेटच्या मैदानावर कॅप्टन कुल नावाने ओळखला जाणारा धोनीला राग येतो. इतक नव्हे तर तो राग कुठे व्यक्त करतो हे देखील सांगतो. साक्षीने या सर्व गोष्टी ()च्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. वाचा- धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने साक्षीचा व्हिडिओ ट्विटर पेजवर शेअर केला. या व्हिडिओत ती म्हणते की, मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी धोनीला त्रास देऊ शकते. त्याच बरोबर साक्षीने हे देखील सांगितले की, धोनी अन्य कोणावरचा राग माझ्यावर काढतो. पण मला त्याने काही फरक पडत नाही. धोनी माझ्या सोबत क्रिकेटबद्दल कधीच बोलत नाही असे देखील साक्षीने सांगितले. वाचा- मुलगी झिवा संदर्भात बोलताना साक्षी म्हणाली, ती वडीलांचे फक्त ऐकते अन्य कोणाचे ऐकत नाही. मला तिला १० वेळा बोलवावे लागते. माहीची आई देखील तिला अनेकदा सांगते की, धोनीच्या सांगण्यावरून ती एका हाकेत जेवते. धोनीच्या वाढवलेल्या केसांबद्दल बोलताना साक्षीने सांगितले, मी त्याला वाढवलेल्या केसांमध्ये पाहिले नाही. तसे असते तर मी त्याच्याकडे पाहिलेच नसते. अशा वाढवलेल्या केसांमध्ये जॉन अब्राहम चांगला दिसतो. वाचा- नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाला प्रथमच प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नाही. स्पर्धा झाल्यानंतर धोनीने आम्ही पुढील वर्षाची तयारी करत असल्याचे सांगितले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kXta0a
No comments:
Post a Comment