मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आज एक धक्कादायक खुलासा केला. गांगुली यांनी यावेळी गेल्या ४-५ महिन्यांमध्ये आपल्या किती करोनाच्या चाचण्या झाल्या, याचा आकडा सांगितला आहे. गांगुली यांच्या नेमक्या किती चाचण्या झाला, हे वाचाल तर तुम्हाला धक्काच बसेल. कारण गेल्या ४-५ महिन्यांमध्ये गांगुली यांच्या तब्बल २२ वेळा करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाच्या एवढ्या चाचण्या का कराव्या लागल्या...करोनाच्या काळात गांगुली हे आयपीएलचे आयोजन करण्यासाठी झटत होते. गांगुली यांनी पुढाकार घेऊन यावर्षीचे आयपीएल युएईतही यशस्वी करून दाखवले. पण गांगुली यांना एवढ्या चाचण्या का कराव्या लगाल्या, याचा खुलासा त्यांनीच केला आहे. याबाबत गांगुली म्हणाले की, " जवळपास गेल्या साडे चार महिन्यांमध्ये माझ्या २२ करोना चाचण्या करण्यात आल्या. या २२ करोना चाचण्यांमध्ये मी एकदाही पॉझिटीव्ह सापडो नाही. माझ्या आजूबाजूला काही करोना पॉझिटीव्ह व्यक्ती मिळाल्या, त्यामुळेच मला एवढ्या करोना चाचण्या कराव्या लागल्या. पण मला मात्र करोना झाला नसल्याचेच चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे." कोणासाठी केल्या एवढ्या करोना चाचण्या, पाहा...याबाबत गांगुली यांनी सांगितले की, " मी माझ्या आई-वडिलांसोबत राहतो. त्यांचे आता वय जास्त झाले आहे. त्यामध्येच मी दुबईचा प्रवास केला. आयपीएलसाठी मला हा प्रवास करावा लागला. सुरुवातीला मला याबाबत फार चिंता वाटत होती. पण स्वत:साठी नाही तर समाजासाठी आणि आपल्या लोकांसाठी या चाचण्या करणे भाग आहे. आपल्यामुळे कोणलाही कसलीही बाधा होऊ नये, असेच मला वाटते. त्यामुळे एवढ्या करोना चाचण्या मला कराव्या लागल्या." इंग्लंडच्या दौऱ्याबाबत सौरव गांगुली म्हणाले की, " इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहे. दौऱ्यामध्ये दोनच संघ असतात, त्यामुळे गोष्टी हाताळण्यासाठी जास्त कठिण नसतात. पण तरीही आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. काही लोकं बोलत आहेत की, करोनाची दुसरी लाट येणार आहे. त्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m3jKl4
No comments:
Post a Comment