नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत २०१३ सालापासून एकही मालिका झालेली नाही. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका खेळवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आता मोठे पाऊल उचलणार आहे. आयसीसीचे अध्यक्षपद आता न्यूझीलंडच्या ग्रेक बार्कले यांनी सांभाळले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत आतापर्यंत गेल्या सात वर्षांमध्ये एकही मालिका झालेली नाही. पण राजकीय संबंध बाजूला ठेवून आता बार्कले हे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका कशी खेळवण्यात येईल, याबाबत मोठे पाऊल उचलणार आहेत. याबाबत बार्कले यांनी सांगितले की, " भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश आहेत, पण त्यांच्यामध्ये सध्याच्या घडीला तणावाचे संबंध आहेत. पण आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेटचा विचार करतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका कशी खेळवली जाईल, याबाबत मी संवाद साधणार आहे. त्यामुळे मला वाटते की, यापुढे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मािका पाहण्याची संधी मिळेल." बार्कले पुढे म्हणाले की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका ही चाहत्यांसाठी सर्वात मोठा पर्वणी असते. चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेला चांगलीच पसंती देतात. त्यामुळे चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका कशी खेळवता येईल, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांबरोबर मी संवाद साधणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका खेळवण्यात नेमकी कोणती मोठी समस्या आहे, हे जाणून घेऊन ती सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका मालिका पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. मला अशी आशा आहे की, या कामामध्ये मी यशस्वी होईन आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका पुन्हा एकदा सर्वांना पाहता येईल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39tAgrc
No comments:
Post a Comment